Sunday, June 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपतील अतंर्गत कलह शिगेला पोहचला भाजप आमदार दादाराव केचे यांच्या समर्थनार्थ...

भाजपतील अतंर्गत कलह शिगेला पोहचला भाजप आमदार दादाराव केचे यांच्या समर्थनार्थ निघाला भव्य मोर्चा, दुपारी एक वाजता पर्यंत बंद होता बाजार रस्त्यात अडवुन शिवीगाळ करणाऱ्यांना अटक करण्याची केली मागणी

आर्वी,दि.२६:- भाजप मधील अतंर्गत कलह शिगेला पोहचला असुन आमदार दादाराव केचे यांना रस्त्यात अडवुन शिवीगाळ करण्यापर्यंत मजल पोहचली आहे या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असुन भाजप आमदार दादाराव केचे यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (ता.२६) भव्य मोर्चा काढण्यात आला. तर रस्ता अडवुन शिवीगाळ करणाऱ्या महिलांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकतीच नगर परिषद निवडणुकी झाली. यात पराभव झालेल्या भाजप महिला उमेदवार शुभांगी भिवगडे, सौ. मनिषा बावने, सौ.सारिका लोखंडे, सौ. लक्ष्मी घाटनासे यांनी गुरूवारी (ता.२५) विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांना डॉ. अरुण पावडे यांच्या रुग्णालयाजवळ गाठुन त्यांच्या दुचाकीची चावी हिसकावुन घेतली व अवार्च भाषेत शिवीगाळ केली. याची माहिती समाज माध्यमातुन परिसरात पोहचली. आमदार केचे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना चांगलाच धक्का पोहचला. दुसरे दिवशी शुक्रवारी (ता.२६) सकाळी दहा वाजता नागरीकांना स्वयंस्फुर्तीने या कृत्याचा निषेध नोदंवीण्याकरीता भव्य मोर्चा काढला. तर दुपारी एक वाजता पर्यंत शहरातील व्यापार पेठ पुर्ण बंद ठेवण्यात आली.
या मोर्चात स्वप्नील ऊर्फ बाळ जगताप, शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख योगेश उर्फ गुड्डु गावंडे, काँग्रेसचे पंकज वाघमारे, दिलीप जाधव, सुधीर जाचक, प्रदिप मेंढे, वृषभ निस्ताने, संदेश गभणे, नगरसेवीका प्रीयंका भिमके, हेमलता जाधव, गणेश उर्फ रामु राठी तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
                     

           शांत आर्वी शहरावर पडली राजकारण्यांची काळी नजर

हि घटना घडण्याच्या पुर्वी पर्यंत आर्वी शहर म्हणजे शांत शहर म्हणुन मोठ्या अभिमानाने सांगत होतो. मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातुन या शहरावर राजकारण्यांची काळी नजर पडली आणी शहराची शांतता भंग झाली. याला जेवढे जबाबदार बडे राजकारणी आहे तेवढेच जबाबदार पोलीस प्रशासनाचे अधिकारी सुध्दा असल्याच नागरिकांच म्हणन आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांने विरोध पक्षाच्या उमेदवाराच्या घरात शिरुन मारहान केली मात्र पोलीस प्रशासनाने यात सुध्दा कारवाई करण्यास दिरंगाई केली. तक्रार लिहुन घेण्याकरीता तब्बल पाच ते सहा तास त्यांना ठाण्यात बसवुन ठेवल कारवाई मात्र शुन्य झाली. परिणामी पोलीसांचा वचक कमी झाला आणी आता तर आमदार दादाराव केचे यांना रस्त्या अडवुन शिवीगाळ करण्यापर्यंत मजल पोहचली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातातवरण पसरले आहे.
तक्रार देवुन १८ तास झाले मात्र पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेंतली नाही
           
            आमदाराचे हे हाल तर नागरीकांचे काय होईल?
या प्रकरणी आमदार दादाराव केचे यांनी गुरूवारी (ता.२५) रात्री येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या सौ. सारीका लोखंडे, सौ. मनिषा बावणे, सौ. शुभांगी भिवगडे, सौ. लक्ष्मी घाटनासे, पंकज लोखंडे, रवी गाडगे, प्रतीक बावणे, संजय घाटनासे आदिंच्या विरुध्दा तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेवुन त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरीता शुक्रवारी (ता.२६) नागरिकांना भव्य मोर्चा सुध्दा काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, ठाणेदार सतिश डेहणकर यांनी लगेच गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करतो असे सांगीतले मात्र या घटनेला तब्बल १८ तास होवुन सुध्दा पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली असून आमदाराचेच जर हे हाल असेल तर आमचे काय होणार? प्रश्न विचारल्या जात आहे.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular