आर्वी,दि.१८:- २१ महाराष्ट्र बटालीयन एनसीसीच्यावतीने येथील पि एम श्री गांधी विध्यालयाच्या प्रांगणावर “अ” प्रमाण पत्र परिक्षा घेण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या परिक्षा प्रक्रीयेत आर्वी, आष्टी व पुलगाव च्या विविध शाळांमधील १८० छात्र सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर, नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. स्वती गुल्हाणे व उपाध्यक्ष गौरव जाजु यांनी सुध्दा या दरम्यान परिक्षा केंद्राला भेट दिली.

शनिवारी (ता.१७) व रवीवारी (ता.१८) २१ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जोशांतो के यांच्या मार्गदर्शनात परिक्षा घेण्यात आल्या. परिक्षा घेण्याकरीता २१ महाराष्ट्र बटालीयन वर्धा येथील भारतीय सेनेमधील नायब सुभेदार निरज सिंग, हवालदार सतीश पुरकर, हवालदार बद्री प्रसाद, नायक कैलास सिंग यांची नेमणुक करण्यात आली होती. प्राचार्य विश्र्वेश्वर पायले, पर्यवेक्षीका कु. ज्योती अजीमीरे यांनी त्यांचे स्वागत केले.

शनिवारी (ता.१७) एन.सी.सी. विध्यार्थ्यांची ड्रिल, मॅप रिडींग, वेपण ट्रेनिंग, फिल्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट आदि मैदानी ऍक्टिव्हिटीची परिक्षा घेण्यात आली. तर, रवीवारी (ता.१८) लेखी परिक्षा घेण्यात आली. परिक्षेमध्ये नगर परिषद गांधी विध्यालय आर्वीचे ५५ छात्र सैनिक, आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विध्यालयाचे २५ छात्र सैनिक, पुलगाव येथील इंडियन मिलिटरी स्कुलचे २५ व ज्ञान भारती विध्यालयाच्या ४८ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.
एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे, संजय शिरसाट, दिनेश चंदिवाले, रवींद्र कुडकले, प्रवीण शेळके यांनी विध्यार्थ्यांची परिक्षा घेतली. तर, पहिल्या दिवशी कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जी शांतो यांनी भेट दिली. तर, दुसरे दिवशी नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे व उपाध्यक्ष गौरव जाजु यांनी परिक्षा केंद्राला भेट दिली.
“अ” प्रमाण पत्राचा असा मिळतो विध्यार्थ्यांना लाभ
दोन वर्षा करीता एन.सी.सी. मध्ये विध्यार्थ्याची निवड केल्या जाते. या निवड झालेल्या विध्यार्थ्यांना वर्ग नववी मध्ये दहा दिवसाचा कॅम्प करणे अनिवार्य आहे. त्या नंतरच ५०० गुणांची परीक्षा देण्याकरीता त पात्र ठरतात. या परिक्षेमध्ये जे विध्यार्थी उर्तीण होतात. त्यांना मुंबई निर्देशालयामार्फत “अ” प्रमाण पत्र देवुन त्यांचा सन्मान केल्या जात. भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अर्ध सैनिक बल आदिंमध्ये भरती करतांना “अ” प्रमाण धारक विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिला जाते तर त्यांच्या गुणांमध्ये सुध्दा वाढ होते.






