Thursday, August 6, 2026
Google search engine
HomeMaharastra*** शासन, प्रशासन व प्रतीनीधीच लक्ष वेधुन घेणारी घटना *** शेतकऱ्याने शेतातील...

*** शासन, प्रशासन व प्रतीनीधीच लक्ष वेधुन घेणारी घटना *** शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात विष प्राशन करुन केली आत्महत्या *** दहा म्हशी, दोन गायी मेल्या होत्या जळुन तर, नापीकीने सुध्दा त्यात टाकली होती भर ***

आर्वी,दि.१५:- सततची होत असलेली नापीक त्यातच काही दिवसांपुर्वी गोठ्याला आग लागल्यामुळे दहा म्हशी, दोन गायी जळुन ठार झाल्या. परिणामी आर्थीक विंवचनेत अडकलेल्या तळेगाव (शा.पं.) लगतच्या आनंदवाडी येथील शेतकऱ्याने शेतातील त्याच गोठ्यात विष प्राशन करुन आत्महत्या केली. बुधवारी (ता.१४) दुपारी हि दुर्दैवी घटना घडली आहे

सुभाषराव पांडुरंग पन्नासे (६७ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाह शेती, यातुन निसर्गाच्या अवकृपेमुळे सततची नापीकीला सामोरे जावे लागत असे. शेतामधुन अपेक्षीत उत्पन्न निघत नसल्याने नेहमीच आर्थीक चणचण निर्माण होत असे. अशातच तारण ठेवलेले सोने व बँकेच्या असलेल्या कर्जाचा वाढता बोजा कसा उतरावा याची सततची चिंता. त्यातल्यात्यात काही दिवसापुर्वी गोठ्याला आग लागल्याने दहा म्हशी आणी दोन बैल जळुन मृत्युमुखी पडले आणी लाखो रुपयाचे नुकसान झाले. मात्र शासनाकडून मदतीचा हात मिळाला नाही. आदीमुळे आर्थीक चक्रव्युहात सापडलेल्या सुभाषला यातुन निघण्याचा कुठलाच मार्ग सुचला नाही. शेवटी त्यांनी स्वत:ला संपवीण्याचा निर्णय घेतला.

दुपारी दोन ते तीन वाजताचे दरम्यान शेतात चक्कर मारुन येतो असे सांगुन घरुन गेले ते शेवटचेच ठरले. ज्या गोठ्यात गाई-म्हशी जळुन ठार झाल्या होत्या त्याच शेतातील गोठ्यात गेले आणी विष प्राशन केलं. लगतच्या शेतकऱ्यांना हे लक्षात येताच त्यांनी तातडीने आर्वी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.

        शासन, प्रशासन व लोक प्रतीनीधी गंभीरपणे घेतील काय?         

राज्यात सतत शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत असुन त्यामध्ये या माध्यमातुन अजुन एकाची भर पडली आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे आर्थीक अडचणीत सापडल्यामुळे शेतकरी कर्जाच्या जोखडात अधीकाअधीक फसत जात आहे.  या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधुन घेणारी हि घटना असुन शासन, प्रशासन व लोक प्रतीनीधी याला तेवढ्याच गंभीरपणे घेतली काय? असा प्रश्न विवंचणेत अडकलेल्या शेतकऱ्यांचा व नागरीकांचा आहे.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular