आर्वी,दि.१५:-राष्ट्रसेवीका समितीच्यावतीने वंदनीय मावशी केळकर यांच्या स्मृती पित्यार्थ रवीवारी (ता.११) प्रथमच पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध माध्यमातुन समाजात, सेवा समर्पण व राष्ट्रभक्तीचे बिजारोपण करण्याचे कार्य राष्ट्रसेवीका समितीच्या वतीने केल्या जाते. त्याच अनुषंगाने येथील श्रीराम प्राथमीक शाळेच्या प्रांगणावरुन पथ संचालनाला सुरूवात करण्यात आली. कसबा मार्गे होत स्टेशन वार्डातील श्रीराम शाळेच्या प्रांगणात हिचा समारोप झाला. यात नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांच्यासह ५५ मंगल गणवेश धारी सेवीका सहभागी झाल्या होत्या.

या प्रसंगी सौ. ज्योत्सना गिरधर, ॲड. अरुणाताई देशपांडे, सौ. कवीता जोशी आदिंनी मार्गदर्शन केले. तर, जिल्हा कार्यवाहीका अनुराधाताई भोकरे, जिल्हा सहकार्यवाहीका कल्पनाताई मशानकर ,जिल्हा संपर्कप्रमुख उज्वलाताई केळकर, जिल्हा शारीरिक प्रमुख सुप्रियाताई अभ्यंकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
पथ संचलनाची शाखा सौ. साधना पेंडके यांनी घेतली. प्रार्थना व सांघीक गीत सौ. ज्योती कुलकर्णी यांनी तर, वंदे मातरम गीताचे गायन शिवाणी देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाला राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणी रामनवगी शोभा यात्रा समितीचे विशेष योगदान व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. अर्चना देशपांडे यांनी करुन आभार मानले.






