Thursday, August 6, 2026
Google search engine
HomeMaharastra*** आर्वी नगर पालीकेच्या उपाध्यक्षपदी गौरव जाजु यांचा विजय *** राष्ट्रवादी काँग्रेस...

*** आर्वी नगर पालीकेच्या उपाध्यक्षपदी गौरव जाजु यांचा विजय *** राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)च्या नितीन लोहेचा त्यांनी ६ मताने केला पराभव *** तर, भाजपच्या प्रशांत ठाकुर, सुनील बाजपेयी व महायुतीच्या अब्दुल रशीद यांची स्वीकृत सदस्य पदावर नियुक्ती***

         आर्वी,दि.१६:- नगर परिषदेच्या शुक्रवारी (ता.१६) झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदाकरीता झालेल्या निवडणुकीत भाजपचे गौरव जाजु हे निवडुन आले आहे तर, भाजपचे प्रशांत ठाकुर, सुनील बाजपेयी व महायुतीचे अब्दुल रशीद शेख कादर चुनेवाले यांची नामनिर्देशीत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या विजयाचा जल्लोशात स्वागत केले आहे.

नवनिवार्चीत नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाने यांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी करीता व नामनिर्देशीत सदस्यांच्या नियुक्तीकरीता गुरूवारी (ता.८) काढलेल्या नोटीस प्रमाणे शुक्रवारी (ता.१६) येथील नगर परिषदेच्या सभागृहात पहिली सर्व साधारण सभा झाली. या सभेत महायतीचे नगराध्यक्षासह १६ सदस्यांनी. तर महाविकास आघाडीच्या १० सदस्यांनी हजेरी लावली.

उपाध्यक्ष पदाकरीता भाजपच्या गौरव जाजु यांनी तर, राष्ट्रवादी काँगेस (श.प.) च्या नितीन लोहे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत गौरव जाजु यांना १६ तर, नितीन लोहे यांना १० मते मिळाली असुन जाजु यांचा ६ मतांनी विजय झाला.

नामनिर्देशीत सदस्य पदाकरीता महायुती व महाविकास आघाडी कडुन प्राप्त झालेल्या शिफारीस पत्र व आर्हतेच्या पुराव्याची छाननी करुन जिल्हाधिकारी वर्धा यांच्या माध्यमातुन उमेदवारांची यादी थेट आघाडी प्रमुखाला प्राप्त झाली. पदनिर्देशीत अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय अंतीम असल्यामुळे त्यांचीच नामनिर्देशीत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्याचे नगराध्यक्षावर बंधणकारक असते. या नियमाला अनुसरुन भाजपच्या प्रशांत ठाकुर, सुनील बाजपेयी तर, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) च्या अब्दुल रशीद शेख कादर चुनेवाले यांच्या नियुक्तीची घोषणा पिठासीन अधिकारी सौ. स्वाती गुल्हाणे यांनी या सर्वसाधारण सभेत केली.

सभेच्या पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे ह्या होत्या तर, भाजपचे गौरव जाजु, संजय राऊत, मनोज आगरकर, जगन गाठे, संजय थोरात, अजय कटकमवार. लवेश गलोले, देवीदास साठे, कांता कसर, संपदा जोशी, शुभांगी गाठे, उषा सोनटक्के, उर्मीला पवार, खान महताब खातुन युसूफ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे नितीन लोहें,  गाेवींद उईके, ज्ञानेश्वरी जाचक, शितल मोहोड, वंदना देवघरे, सौ. हेमलता जाधव, प्रतीभा गीरी. काँग्रेसचे पंकज वाघमारे, प्रियंका भिमके तर, शिवसेना (उबाठा) चे योगेश उर्फ गुड्डु गावंडे हे नगर सेवक उपस्थीत होते.

या सभेकरीता मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर व नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

जाजु परिवाराच्या तिसऱ्या पिढीने रोवला झेंडा

          नगर परिषदेचा इतीहास पाहता सन १९३५ मध्ये गौरव जाजु यांचे पणजोबा खुशालचंद जाजू यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. तब्बल २० वर्षा नंतर १९५५ ला त्यांचे आजोबा विठ्ठलदास जाजु हे नगराध्यक्ष पदावर विराजमान होते. तर ७० वर्षा नंतर जाजु परीवाराच्या तिस-या पिढीतील गौरव जाजु यांनी सर्वांत जास्त मताधीक्यानी निवडणुक तर जिंकलीच शिवाय निवडणुकीच्या माध्यमातुन उपाध्यक्ष पदावर विराज मान होण्याचा बहुमान सुध्दा मिळाला आहे.  त्यांचेवर सर्व स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular