Sunday, June 21, 2026
Google search engine
HomeUncategorized***कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयाच्यावतीने पत्रकारांचा केला सत्कार ***प्रसीध्द होणाऱ्या चांगल्या बातम्या,...

***कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयाच्यावतीने पत्रकारांचा केला सत्कार ***प्रसीध्द होणाऱ्या चांगल्या बातम्या, लेख व माहिती वाचल्या गेल्या पाहिजे -ॲड. शोभाताई काळे***

आर्वी दि.१४:- वृत्तपत्राच्या माध्यमातुन नकारात्मक बातम्यांसोबतच चांगल्या बातम्या, लेख व माहिती सुध्दा प्रसिध्द होतात. यातील चांगल्या बातम्या व लेख वाचल्या गेल्या पाहिजे सोबतच यातुन मीळणारी माहिती सुध्दा अवगत केल्या गेली पाहिजे असे कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲड. शोभाताई काळे यांनी येथे प्रतिपादन केले.

येथील कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयाच्यावतीने बुधवारी (ता.१४) सन्मान सोहळ्याचे आयोजन करुन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन करीत होत्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के हे होते. तर, मदत फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनील जोशी, वृत्तपत्र संपादक विजय अजमीरे, जेष्ठ पत्रकार सुर्यप्रकाश भट्टड हे प्रमुख अतिथी होते.

पुढे त्यांनी, नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढावी याकरीता महाविध्यालयाच्या माध्यमातुन “ वाचते व्हा” हा उपक्रम गत तिन वर्षा पासुन राबवीला जात असल्याची माहिती देवुन पाहता पाहता यात सुमारे तीन हजार विध्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती दिली तसेच पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रवी सोनटक्के यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना, आधुनीकतेच्या काळात पत्रकारीता क्षेत्रात प्रचंड तफावत निर्माण झाल्याचे सांगुन आधीच्या काळात पत्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळावर जावुन माहिती गोळा करावी लागत होती तर, आता मोबाईलच्या माध्यमातुन लगेच माहिती मिळत असली तरी त्या घटनेला शब्दबध्द करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा अर्थाचा अनर्थ सुध्दा घडतो आणी म्हणुनच पत्रकार बनने ऐवढे सोप नाही अस त्यांनी सांगीतलं. सोबतच महाविध्यालयाच्या वेळोवेळी झालेल्या शैक्षणीक प्रगतीची माहिती सुध्दा दिली.

या शिवाय अनील जोशी, विजय अजमीरे, राजेश अहीव, प्रकाश राठी, नझीर खांन, अभय दर्भे आदिनी सुध्दा मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले.

यावेळी, पत्रकार अनील जोशी, संपादक दशरथ जाधव, विजय अजमीरे, सतीश शिरभाते, सुर्यप्रकाश भट्टड, प्रकाश राठी,अभय दर्भे, सुनील पारसे, राजेश अहिव, अक्षय अहिव, राजु सोळंकी, पुरूषोत्तम नागपुरे, सुरेंद्र डाफ, विजय जयस्वाल, टेकचंद मोटवाणी, राजु डोंगरे, प्रमोद येडाखे, इक्बाल शेख, प्रमोद डोळस, दिनेश सोळंकी, पंकज गोडबोले, नितीन आष्टीकर, उदय बाजपेयी, नझीर खान, अनीस चोरडीया, मनोज राऊत आदिंचा यावेळी पेन, डायरी व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.डॉ. श्यामप्रकाश पांडे यांनी मांडली, संचालन प्रा. दर्शन चांभारे यांनी केले. तर, आभार प्रा. डॉ अनील दहाट यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता महाविध्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापीका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सत्कार मुर्ती

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular