Wednesday, August 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप

येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट या समाजसेवी संस्थेच्या वतीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावर्षी थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात मध्यमवर्गीय रुग्ण तसेच गरोदर व बाळंतीण माता उपचार घेतात. वाढत्या थंडीपासून रुग्णांचा बचाव व्हावा याकरिता नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आला. गीमाटेक्स च्या संचालिका ,समाजसेवी लतादेवी मोहता ,डॉ.सोनाली वासाडे, डॉ. रश्मी खिळेकर ,डॉ.नम्रता जानईकर, डॉ.आशिष लांडे, डॉ.रुईकर ,मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांचे हस्ते रुग्णांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना समाजसेवी मोहता यांनी मित्र परिवाराच्या या अतुलनीय कार्याचे कौतुक केले. नरसेवा हीच ईश्वर सेवा असून तळागातील गरजू, निराधार वृद्ध लोकांना सेवा देणे, त्यांना आधार देणे हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाट चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची आयोजनाकरिता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य दिले.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular