Thursday, August 6, 2026
Google search engine
HomeMaharastra***कारंजा (घडगे) येथील राष्ट्रीय महामार्गावरील उडाण पुलाला अवघ्या दोन वर्षात गेले तडे...

***कारंजा (घडगे) येथील राष्ट्रीय महामार्गावरील उडाण पुलाला अवघ्या दोन वर्षात गेले तडे *** प्रवाश्यांसह नागरीकांच्या जिवीताचा प्रश्न एैरणीवर *** खासदार अमर काळे यांनी दिले प्राधिकरणाला पत्र

आर्वी,दि.७:- अमरावती- नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा (घाडगे) येथे अवघ्या दोन तिन वर्षा पुर्वी पुर्णत्वास गेलेल्या उडाण पुलाला तडे गेल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसह कारंजा (घाडगे) येथील नागरीकांच्या जिवीताचे प्रश्न सुध्दा एैरणीवर आले आहे. खासदार अमर काळे यांनी याची दखल घेवुन दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सचीवाला पत्र लिहुन तातडीने उपाययोजना करण्याची सुचना केली आहे.

कारंजा (घाडगे) येथील नागरिकांच्या मागणीवरुन भाजपचे सुधीर दिवे यांच्या प्रयत्नाने निर्माण करण्यात आलेल्या अमरावती – नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील उडाण पुलाला अवघ्या दोन-तीन वर्षातच तडे गेले आहे. हा उड्डाण पुल कारंजा (घाडगे) शहराच्या मध्यभागातील बाजार पेठ व बस स्थानकाला दुभाजून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही दिवसा पुर्वी येथील नागरीकांना या उडाण पुलाला तडे गेल्याचे दिसुन आले. अनेक वर्तमान पत्रामधुन याचे वृत्त सुध्दा प्रसीध्द झाले होते. याची दखल खासदार अमर काळे यांनी घेतली. त्यांनी उडाण पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता निकृष्ट बांधकामाचा हा दुष्परीणाम प्रथम दर्शनी दिसुन आला आहे.

वाहतुक बंद करा व निकृष्ट बांधकामाची चौकशी करा

          निकृष्ट बांधकामा मुळेच या पुलाला तडे गेले असावे असा प्राथमीक अंदाज असुन उडाण पुलाच्या बांधकामाची तज्ञ तांत्रीक पथकाकडुन तपासणी करुन वाहतुकीस योग्य आहे की नाही याची खातरजामा करुन घेण्यात यावी तसेच पुल धोकादाय असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने यावरील वाहतुक बंद करण्यात यावी. याशिवाय निकृष्ट बांधकामाकरीता जबाबदार असलेल्या अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशा सुचना खासदार अमर काळे यांनी दिलेल्या पत्राच्या माध्यमातुन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम प्राधीकारण सचीवाला सुचना केली आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular