आर्वी,दि.९:- सहकार भारती आर्वी तालुक्याच्यावतीने सहकार भारती स्थापना दिना निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या प्रसंगी आर्वी नगर परिषदेच्या नव निर्वाचीत अध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांचा सत्कार व तालुक्याच्या नवीन कार्यकारणीचे गठण सुध्दा करण्यात येणार आहे.
येथील तेलंगराय पत संस्थेच्या सभागृहात रवीवारी (ता.११) ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदत फाउंडेशनचे स्थापक अध्यक्ष अनील जोशी हे आहेत. तर, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, तेलंगराय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक पोतदार हे प्रमुख अतिथी आहेत.
या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पतसंस्था संचालक व कर्मचारी आदिंनी उपस्थीत राहावे असे आवाहन सुर्यकांत महाजन, सुनील पारसे, सुरेश काकडे आदिंनी केले आहे.





