आर्वी,दि१०:- नागपुरच्या ग्रामीण विकास संस्थेव्दारा संचालीत येथील कन्नमवार विध्यालयाने “संस्थापक जयंती महोत्सवाचे” आयोजन केले होते. यात नवनिर्वाचीत नगराध्यक्षा व नगरसेवीकेसह खेळात व अभ्यासात प्रावीण्यप्राप्त विध्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. सोबतच कबड्डी स्पर्धेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपुरच्या ग्रामीण विकास संस्थेचे सदस्य अभिषेक गुंडेवार हे होते.तर, शाळा समितीचे सदस्य साबीरभाई, मराठी साहित्यीक राजाभाऊ देशपांडे, नगरसेवीका सौ. हेमलता दिलीप जाधव, ठाकुर उमरावसींह प्राथमीक शाळेचे माजी मुख्याध्यापक सतीश शिरभाते, विध्यालयाचे मुख्याध्यापक हिराचंद रेवतकर, पर्यवेक्षक कपील ठाकुर, नारा च्या कु. ईपर, नगर परिषदेचे माजी सभापती प्रकाश गुल्हाणे हे प्रमुख अतीथी होते.

या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे व नगरसेवीका सौ. हेमलता दिलीप जाधव यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ग्रामगीतेची आवृती देवुन तर, मराठी व उर्दु भाषा विषयात उच्च गुण घेवुन उत्तीण झालेल्या विध्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह् प्रमाणपत्र व रोख पारितोषीक देवुन याशिवाय राज्यस्तरावर हॉलीबॉल खेळात प्रतिनिधित्व केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा शील्ड, प्रमाणपत्र व हॉलीबॉल भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना, शाळेच्या विकासाकरीता सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर, विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता संस्थेच्यावतीने राबवील्या जात असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
संचालक अभिषक गुंडेवार यांनी, कार्यक्रमाच्या आयोजनाची भुमीका विषद करुन कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. तर, पर्यवेक्षक कपील ठाकुर यांनी खेळाविषय मार्गदर्शन केले.
संस्थापक जयंती महोत्सव अंतर्गत आयोजीत कबड्डी स्पर्धेत ग्रामीण विकास संस्थेव्दारा संचालीत कन्नमवार विध्यालय आर्वी, कस्तुरबा विध्यालय कारंजा (घाडगे), कर्मवीर दादासाहेब कन्नमवार विध्यालय कन्नमवार ग्राम, स्वर्गीय अण्णासाहेब गंडेवर विध्यालय नारा येथील विध्यार्थ्थी व विध्यार्थ्थांच्या चमुने सहभाग घेतला होता.

दोन वयोगटात विभागुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील मुलांच्या १४ वर्ष वयोगटा मधुन आर्वीची कन्नमवार विध्यालयाची चमु विजयी ठरली तर, कारंजा येथील कस्तुरबा विध्यालयाची चमु उपविजेता राहिली. मुलीच्या गटामधुन कन्नमवार ग्राम येथील, कर्मवीर दादासाहेब विध्यालयाची चमु विजेती राहिली. तर, कारंजाच्या कस्तुरबा विध्यालयातील चमुने उपविजेतेपद पटकावीले.

मुलांच्या १७ वर्ष वयोगटामधुन कन्नमवार ग्राम येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार विध्यालयाची चमु विजय ठरली. तर, नारा येथील स्वर्गीय अण्णासाहेब गुंडेवार विध्यालयाची चमु उपविजेती राहिली. मुलींच्या स्पर्धे मधुन कारंजा येथील कस्तुरबा विध्यालयाची चमु विजेती राहिली तर, कन्नमवार ग्राम येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार विध्यालयाची चमु उपविजेती ठरली.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक रेवतकर यांनी मांडली, संचालन दिनेश साव यांनी केले, तर आभार अजय खंडाईत यांनी मानले.
या महोत्सवाच्या यशस्वीत्तेकरीता, संयोजक दिलीप जाधव व लक्ष्मीकांत घोटकर यांनी परिश्रम घेतले तर शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी त्यांना सहकार्य केले.





